PRADHAN MANTRI AWAAS YOJANA-GRAMIN प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना ग्रामीण भागातील एक गृहनिर्माण योजना आहे. या योजनेमध्ये ज्या लोकांना राहण्यासाठी पक्के घर नाही त्यांना या योजनेतून पक्के घर उपलब्ध करून दिले जाते. मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रात प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला पुढील प्रकारे अर्ज करता येतो.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी अर्ज करायचा असेल तर पुढील पात्रता आवश्यक आहे.
1. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमच्याजवळ अगोदर पक्के घर नसले पाहिजे, तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तसेच तुम्ही खालील श्रेणीतील संबंधित असणे आवश्यक आहे.
दारिद्र्यरेषेखालील (BPL)
दारिद्र्यरेषेवरील (APL) वार्षिक तीन लाख रुपये पर्यंतच्या कौटुंबिक उत्पन्नासह
अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जमाती (ST)
इतर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित श्रेणी
अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- तुम्हाला तुमची ओळख उत्पन्न आणि इतर तपशील यांचा पुरावा म्हणून काही कागदपत्रे सादर करावे लागतात.
- तुमचा ओळखीचा पुरावा जसे की मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड
- उत्पन्नाचा पुरावा तलाठी किंवा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
- जमिनीच्या मालकीचा पुरावा
अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी अर्ज तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन करावा लागतो. एकदा तुम्ही तुमचा अर्ज सिमेंट केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून त्याचे पुनरावलोकन केले जाते तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला सुचित केले जाईल आणि पुढील पाऊले उचलण्यासाठी अधिक माहिती दिली जाईल.