संजय गांधी निराधार योजना
महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब आणि निराधार लोकांसाठी विविध योजना राबवत असते. या सर्व योजनांमध्ये संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये लाभार्थी व्यक्तीला एक हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य केले जाते.
या योजनेसाठी कोण पात्र आहे
संजय गांधी निराधार पेन्शन योजना अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला लाभ घेऊ शकतात. या योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अंत अपंग अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटीत महिला, वैशाली व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला यांना आर्थिक सहाय्य केले जाते.
- अपंग व्यक्ती
- मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती
- अनाथ मुले
- निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला.
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
- घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला.
- अत्याचारीत महिला
- वैशा व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
- देवदासी
- पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री
अर्ज PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला तो राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्या तलाठी कार्यालय मध्ये घेऊ शकता.