नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या पशुपालन योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शेतकऱ्यांकडून मागवले जात आहेत. या योजनांमध्ये दोन दुधाळ गाई किंवा म्हशी, कुक्कुटपालन, आणि शेळीपालन यांच्यासाठी शासनाकडून 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत पुढील योजना राबवल्या जात आहेत.
राज्यस्तरीय योजना - दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे.
राज्यस्तरीय योजना - शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे.
राज्यस्तरीय योजना - 1000 मांसल कुकुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे.
जिल्हास्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे.
जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे
जिल्हास्तरीय योजना - तलंगा गट वाटप करणे.
जिल्हास्तरीय योजना - एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे.
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत
दिनांक 13.12.2022 ते 11.01.2023
Tags:
pashupalan yojana