महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची प्रक्रिया शासनाकडून राबवली जात आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा दुसरा टप्पा सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्या मध्ये शासनाने बँकांना पात्र शेतकऱ्यांची यादी सुपूर्द करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही तारीख दिली होती बँकांनीही आता शासनाकडे याद्या पाठवल्या आहेत. यानुसार आता 5 डिसेंबर पर्यंत तिसरी यादी प्रकाशित होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही 5 डिसेंबर नंतर तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन यादी आली आहे का याची चौकशी करू शकता.