नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान योजना शासनाने जाहीर केली होती. या योजनेसाठी कात्र असणारे शेतकऱ्यांची पहिली, दुसरी यादी आणि काही जिल्ह्यांमध्ये तिसरी यादी जाहीर करण्यात आले आहे. तसेच पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा ही करण्यात आली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांचे अनुदानाची रक्कम लवकरच जमा होईल असे सांगण्यात येत आहे. तसेच काही शेतकरी पात्र असूनही त्यांचे लाभार्थी याद्या मध्ये नावे नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी पुढील यादी येईल का? येणार असेल तर ती यादी कधी येईल? असे महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.
शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान पुढील यादी येईल का?
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली आणि दुसरी यादी तसेच काही जिल्ह्यांमध्ये तिसरी यादी जाहीर करण्यात आले आहे. पहिले यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा ही झाली आहे. परंतु असे अजून बरेच शेतकरी आहेत जे योजनेसाठी पात्र असूनही त्यांचे जाहीर करण्यात आलेल्या याद्यांमध्ये नावे नाहीत. अशा या शेतकऱ्यांची पुढील यादी शासनाकडून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल अशी माहिती सांगण्यात येत आहे. तसेच या योजनेस पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांची ही यादी शासन जाहीर करणार आहे अपात्र शेतकऱ्यांची यादी आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.