नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती उपयोगी कृषी यंत्र अवजारांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. सर्व कृषी यंत्राच्या खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. पॉवर टिलर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो तसेच एससी एसटी अशा मागासवर्गीय आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान तर इतर लाभार्थी शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही जवळ येईल महा-ई-सेवा केंद्र मध्ये किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज करावा अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने तुमची निवड होते, निवड झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतात कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती येते पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला पॉवर टिलर ची खरेदी करावी लागते पॉवर टिलर खरेदी केल्यानंतर बिले ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावी लागतात. अपलोड केल्यानंतर सर्व कागदपत्रांची छाननी होऊन तुमचे प्रकरण मंजूर होते आणि तुम्हाला शासकीय अनुदान थेट बँक खात्यामध्ये दिले जाते.
👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.