नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावातील गायरान जमीन कोणाच्या मालकीची असते? तसेच या गायरान जमिनीचा वैयक्तिक कारणासाठी वापर करता येतो का? याची माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. प्रत्येक गावामध्ये एकूण जमिनीच्या पाच टक्के जमीन शासनाने गायरान जमीन म्हणून ठेवण्याचे नियम आहेत. गायरान जमिनीचा वापर गावातील गाई म्हैस शेळी अशा गुरांसाठी चरण्यासाठी वापर केला जातो. गायरान जमिनीवर मालकी शासनाची असते परंतु अधिकार ग्रामपंचायत चे असतात. तसेच गायरान जमिनीचा वापर वैयक्तिक कारणासाठी कोणालाही करता येत नाही. असा शासन नियम आहे.