नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट विभागामार्फत सामान्यांसाठी असणाऱ्या विमा योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वसामान्य जनतेला परवडेल एवढ्या कमी रकमेत भारतीय डाक विभाग नागरिकांना दहा लाख रुपयांचा विमा देत आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण येथे घेणार आहोत. मित्रांनो पोस्ट कार्यालयातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी बजाज अलायन्स या विमा कंपनीकडून एक खास विमा योजना सुरू करण्यात आले आहे. या विमा योजनेमध्ये फक्त 399 रुपये वार्षिक हप्ता असून विमाधारक व्यक्तीस दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या विमा विमा योजनेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
फक्त 399 रुपयांमध्ये दहा लाख रुपयांची विमा संरक्षण योजना
टपाल खात्याच्या या योजनेचा गरीब व मध्यम वर्गातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. गोरगरीब जनतेला विमा संरक्षण विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे या लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तसेच अडचणीच्या वेळात या लोकांची आर्थिक मदत कोणीही करत नाही.
विमा योजना विषयी महत्त्वाची माहिती
या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासार्हता मिळालेले आहे.
या योजनेमध्ये अवघ्या 399 रुपयांच्या हप्त्यामध्ये एका वर्षात दहा लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो.
यामध्ये विमा धारकाचा अपघाती मृत्यू अपंगत्व किंवा कायमचे अंशिक अपंगत्व असल्यास दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
याशिवाय या विमा मध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास साठ हजार रुपयापर्यंत चा खर्च मिळतो.
योजनेचा कालावधी
या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करता येते.
असा करा अर्ज
तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन तेथे अर्ज भरू शकता. पोस्टात तुमचे बँक खाते असेल तर त्यानंतर देखील अर्ज सादर करू शकता.
आमचा Whatsapp Group जॉईन करा.