महाराष्ट्र राज्यात शेती पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होत असतो. आपल्या राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा आणि अनियमित पाऊस यामुळे कृषी क्षेत्राचे नुकसान होत असते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये ग्रामस्थ शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे. यामुळे हा कार्यक्रम एक लोक चळवळ झाले आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम व राबविलेल्या गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे जलसाक्षरता द्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्रम वापर याकरिता प्रयत्न करणे मृदा व जलसंधारणाची कामे लोक सहभागातून करणे शासनाने जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबवण्यास शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात आले आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.