महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुसुम योजना अंतर्गत मिळणार पाच लाख सौर पंप, देवेंद्र फडणवीस

 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच लाख सौर पंप देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधान परिषदेत बोलत असताना ते म्हणाले की, असे स्वर पंप बसवण्यासाठी जमीन भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न मिळवण्याचा सरकारचा हेतू आहे विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्याने नवीन कृषी पंप मिळतील तर प्रलंबित अर्ज पुढील वर्षी मार्चपर्यंत निकाली काढले जातील असेही त्यांनी सांगितले. 


कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90 टक्के अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे तसेच त्यांचा सिंचनावरील खर्च कमी व्हावा आणि उत्पन्न वाढावे यासाठी सरकारने कुसुम सोलर योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर कुसुम सोलर पंप शेतामध्ये बसून दिले जातात. 


माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, ग्राहकांना अखंडित आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित वितरण क्षेत्र योजना लागू करण्याची घोषणा केली आहे ज्यासाठी महाराष्ट्रातील 39 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post