Join our WhatsApp group

Maha Dbt Farmer शेतकरी योजनांसाठी आता नवीन वेबसाईट, एकावेळी करू शकता अनेक योजनांसाठी अर्ज

 

Maha Dbt farmer नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी अर्ज आता एकाच वेबसाईटवरून करता येत आहे. शासनाने आणलेल्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत नाहीत. योजनेची अंमलबजावणी संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक पोर्टल बनवले आहे. या पोर्टल चे नाव महाडीबीटी असे आहे. या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय योजना एकाच ठिकाणी आहेत.

महाडीबीटी पोर्टल फार्मर (Maha Dbt Farmer)

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी ही अधिकृत वेबसाईट आणली आहे. या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय योजना असतात. शेतकरी एकाच वेळी अनेक योजनांसाठी ही अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आणि फळ लागवड योजना अशा विविध योजना नेहमी सुरू असतात. शेतकरी एकाच वेळी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना अर्ज करताना ऑनलाईन अर्ज फी फक्त 23 रुपये 60 पैसे भरावी लागते. शेतकरी योजनांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. ज्या शेतकऱ्यांची निवड योजनेसाठी होते त्या शेतकऱ्याने पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे अपलोड करावे लागतात. यानंतर शेतकऱ्यांना कृषी यंत्र आणि साहित्याच्या खरेदीसाठी पूर्वसंमती येते यानंतर शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर बिले अपलोड करावे लागतात आणि मग नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग केली जाते.

 

 

 

ही आहे नवीन वेबसाईट

महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन यावर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आहेत. यासाठी आता नवीन वेबसाईट सुरू झाले आहे.https://mahadbt.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाईट आहे.


Farmers scheme in Maharashtra


Mahadbt farmers scheme 

महाडीबीटी या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी खालील योजना आहेत.

ठिबक सिंचन योजना

तुषार सिंचन योजना

ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित सर्व अवजारे

पावर टिलर आणि पावर टिलर चिलीत सर्व अवजारे

पाईपलाईन अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना

फळबाग लागवड योजना

बियाणे अनुदान योजना

खते आणि औषधे अनुदान योजना

शेतकरी मित्रांनो वरील योजना एकाच वेबसाईटवर अर्ज करता येत आहेत. तसेच सर्व योजनांसाठी 50% ते 75 टक्के पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयामध्ये जावे लागत नाही. योजनेचे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते. 


 

 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Post a Comment

Previous Post Next Post