माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र मिलिटरी मिशनचा शुभारंभ झाला आहे. या कार्यक्रमास माननीय कृषिमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादन क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे म्हणून यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मिलेट मिशन साठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे.
या तरतुदीतून तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे
जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांची विक्री यांची मूल्यसाखळी विकसित होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला
Tags:
cm eknath shinde