MPSC Recruitment 2023 Maharashtra नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आठ हजार पदांसाठी मेगा भरती जाहिरात काढले आहे. अनेक वर्षानंतर ही मोठी भरती निघाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एमपीएससी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सरकारी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
MPSC Bharati 2023 महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून ही पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रित गट ब आणि गटक सेवा संयुक्त परीक्षा ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी नियोजित आहे या भरतीतून निवडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते दिले जाणार आहेत.
या पदांसाठी पगार 2500 ते 81 हजार शंभर रुपये इतका असेल मंत्रालय प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखकाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/ भेट द्या