मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरू होणार, नवीन शासन निर्णय आला

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन लाख नवीन पंपा सह सुरू होणार आहे याचा जीआर नुकताच जाहीर करण्यात आला या नवीन जीआर नुसार शेतकऱ्यांना कृषी पंप खरेदीसाठी 90 टक्के ते 95 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचा शेतातील सिंचनावरचा खर्च कमी व्हावा यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना आणली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्रात दोन लाख सौर कृषी पंपाचे वितरित केले जाणार आहेत.


माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत असे जाहीर केले होते आणि आता यानुसारच नवीन शासन निर्णय जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार लवकरच शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत. तसेच सौर कृषी पंपाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना 90% ते 95 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या शासन निर्णयानुसार दोन लाख सौर कृषी पंपांचे सर्व जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात वितरित केले जाणार आहेत. काही दिवसांमध्येच प्रत्येक जिल्ह्याचा कोटा आपल्याला समजणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही लवकर सुरू होणार आहेत. 


शेतकऱ्यांना कृषी सिंचनाचा खर्च कमी व्हावा, तसेच त्यांना 24 तास मोफत सिंचनासाठी सोय व्हावी यासाठी सौर कृषी पंप योजना शासनाने सुरू केले. नवीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर दोन लाख सौर कृषी पंप मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत. याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे या शासन निर्णया मध्ये या योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच या योजनेचा फायदा कसा घ्यायचा हेही या शासन निर्णयामधून समजत आहे. 


शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


सर्व सरकारी योजनांची माहिती येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post