कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना बँक खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम जमा होणार नवीन शासन निर्णय आला

 

 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत सन 2022 23 या आर्थिक वर्षासाठी दीडशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणे बाबत शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी 2023 या दिवशी जाहीर करण्यात आला आहे. 

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच या अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे. 


मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या सन 2019 20 व सन 2020 21 मधील लाभार्थ्यांचे मागील दोन वर्षापासून प्रलंबित असलेले उपरोक्त पूरक अनुदान सण 2022 23 मधील मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षापासून अनुदान प्रलंबित आहे त्यांनाही लवकरच अनुदान मिळणार आहे. 


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन साठी मंजूर अनुदानास पूरक अनुदान देण्याची बाब मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत समाविष्ट असून त्या अंतर्गत सन 2019 20 व सन 2020 21 मधील निवड झालेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित पूरक अनुदान वितरित करण्यासाठी दीडशे कोटी रुपये निधी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीत वितरित करण्यात येत आहे असा शासन निर्णय जाहीर झाला आहे. 


 



 



Post a Comment

Previous Post Next Post