शेतकऱ्यांना पिक विमा प्रलंबित रक्कम लवकरच मिळणार, विमा कंपन्यांना 724 कोटी वितरित

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 724 कोटी इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 13 जानेवारी 2023 या दिवशी जाहीर करण्यात आला आहे. 


प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम सन 2022 23 शासन निर्णय दिनांक 1.7.2022 अन्वये भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. या कंपन्यांना 724 कोटी इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यास अदा करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार या पाच विमा कंपन्यांना 724 कोटी इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. 


या शासन निर्णयामुळे विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई अनुदान रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची लवकरात लवकररक्कम मिळेल अशी आशा आहे.


 



 



Post a Comment

Previous Post Next Post