PM Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचा तेरावा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये देण्यात येईल याची दाट शक्यता आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना या अगोदरचा हप्ता मिळालेला नाही. त्या शेतकऱ्यांना 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये मिळणार आहेत.
पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता : या शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन स्वरूपात दिले जाते. पीएम किसन योजनेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये येणे बंद झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधार केवायसी करून घ्यावी तसेच तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यावे. पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता 23 जानेवारी या दिवशी जमा होईल अशी शक्यता सांगण्यात येत आहे. हा हप्ता तुम्हाला मिळेल की नाही, तुम्ही पीएम किसान योजनेस पात्र आहात की नाही हे आता समजू शकते. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेस पुढील हप्ता घेण्यास पात्र आहात. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच दोन हजार रुपये आणि काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये जमा होणार आहेत.
पी एम किसान योजना बेनिफिशरी लिस्ट
पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आता ऑनलाईन पाहता येत आहे ही नवीन यादी आहे या यादीमध्ये काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे तर काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन नावे यामध्ये समाविष्ट झाले आहेत. ही यादी शासनाने नुकतीच जाहीर केले आहे त्यामुळे या यादीमध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत.