PM Kisan Yojana Beneficiary List Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आता ऑनलाईन पाहता येत आहे. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेस पात्र आहात आणि तुम्हाला लवकरच या योजनेचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यांमध्ये वर्षभरात दिले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेचे आतापर्यंत 12 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आता या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होईल अशी माहिती शासनाकडून मिळत आहे.
पी एम किसान योजना लाभार्थी यादी
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येत आहे. यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. यामध्ये बेनिफिशर लिस्ट हा ऑप्शन आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्हा, राज्य, तालुका आणि गावाची निवड करा यानंतर सर्च या बटणावर क्लिक करून तुमच्या गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पहा. रात्री लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खाली थेट लिंक देण्यात आले आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासून घेऊ शकता.