Pm Kisan Yojana या शेतकऱ्यांचे 2000 येणे झाले बंद , योजनेमध्ये झालेले बदल जाणून घ्या

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेमध्ये 2022 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये येणे बंद झाले आहे. या शेतकऱ्यांचे 2000 येणे बंद होण्यामागची कारणे या पोस्टमध्ये जाणून घेऊया. 


पी एम किसान योजनेमध्ये अनेक बोगस शेतकरी ही या योजनेचा लाभ घेत होते. असे शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने पी एम किसान योजनेची आधार ई केवायसी करणे बंधनकारक केले. तसेच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये अनेक चुका होत्या यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये देण्याचे सुरू केले. या बदलांमुळे जे शेतकरी या योजनेस पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये येणे बंद झाले आहे.  


 

 

पी एम किसान योजनेमध्ये झालेल्या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांचे 2000 येणे बंद झाले आहे. जे शेतकरी या योजनेस पात्र असूनही त्यांचे दोन हजार रुपये चे हप्ते येत नसतील अशा शेतकऱ्यांनी योजनेच्या वेबसाईटवर कस्टमर केअर नंबर वर फोन करून तक्रार करावी. तसेच काहींचा मागील हप्ता जर आला नसेल तरी घाबरण्याची गरज नाही असे शेतकऱ्यांचे दोन्ही हप्ते पुढील हप्त्यात येऊ शकतात. 


Post a Comment

Previous Post Next Post