
या योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2023 ही आहे.
योजनेची महत्वाची माहिती
👉 पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
👉अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.१३.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून ते दि.११.०१.२०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत राहील.
👉योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे.
👉 AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.
👉 आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१-२२ मध्ये AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे.
👉 अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.
👉 महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत.केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
👉 सन २०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
👉 सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
👉 सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.
👉 सन २०२२-२३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
👉 अर्ज करण्यापूर्वी कृपया योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी पहावी. उपलब्ध अर्जांची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेवून योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता पडताळून अर्जदारांनी अर्ज करावा.
👉 अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल.
👉 योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. तसेच प्रणालीवर सूचनाही प्राप्त होतील.
👉 योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.