महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांन. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पुढील काही दिवसातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होईल याची निश्चिती झाली आहे.
शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान योजनेची दुसरी व तिसरी यादी जाहीर झाली आहे या यादीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम पुढील काही दिवसातच मिळणार आहे. याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. सन 2022 23 या आर्थिक वर्षात सातशे कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे. असं शासन निर्णय दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे.
Tags:
50 hajar anudan