नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे मानधन शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यानंतर दोन हजार रुपयांच्या समान हफ्त्यामध्ये दिले जाते. परंतु गेल्या वर्षी या योजनेमध्ये अनेक बदल झाले आहेत. या योजनेमध्ये पात्र नसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आले आहेत. तसेच नवीन शेतकऱ्यांची ही नावे यामध्ये समाविष्ट झाले आहेत. पी एम किसान योजनेमध्ये मागील बारावा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळालाच नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्या वेळी दोन्ही हप्ते देण्यात येतील याची दाट शक्यता आहे. कारण 2022 23 हे आर्थिक वर्ष संपण्या साठी फक्त दोन महिने राहिले आहेत. या आर्थिक वर्षात काही शेतकऱ्यांना दोन हप्ते तर काही शेतकऱ्यांना एकच हप्ता मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात दोन हप्ते मिळण्याची शक्यता वाढली आहे.
Tags:
Pm Kisan Yojana