नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करत आहे. काही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली आहे तर राहिलेले शेतकऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत अनुदान रक्कम मिळेल अशी माहिती देण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी व तिसरी यादी शासनाने जाहीर केली होती या यादीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळत आहे. अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आधार केवायसी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम मिळालेले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम पुढील काही दिवसातच मिळेल.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यां ना पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पहिले यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेले आहे तर दुसऱ्या व तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळण्याची प्रक्रिया चालू आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अनुदान यादी मध्ये नाव आहे का हे तपासून घ्यावे आणि आधार केवायसी करून घ्यावी.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.