नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपूर लाभ योजना या योजनेसाठी निधी वितरित करणे बाबत शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार आता या योजनेस पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना आता 50000 अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी निधी वितरित करणे बाबत शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे.
50 हजार अनुदान योजना चौथी यादी.
शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर अनुदान योजना ही योजना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत राबवली जात आहे या योजनेच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत तसेच या यादीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदानही देण्यात आले आहे. तरीसुद्धा अजून असे बरेच शेतकरी आहेत जे या योजनेस पात्र असूनही त्यांना या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.