
अर्ज मंजूर करण्याची पद्धत
ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शन मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज गावातील तलाठी कार्यालय मध्ये अर्ज करावा लागतो.
अशा अर्जासोबत वर नमूद केलेल्या पात्रतेच्या अटीच्या पूर्ततेसाठी संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिकार्याकडून अशा प्रमाणपत्रांच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळवावेत.
तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करून अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आले आहेत त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे याची सविस्तर नोंदवही मध्ये नोंद घ्यावी व अर्जदाराला वीज नमुन्यात पोच पावती द्यावी तलाठी यांनी नोंदवही ठेवणे व त्या मध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक राहील.
तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबत कागदपत्राची छाननी व पडताळणी करून अर्ज संबंधित तहसीलदार / नायब तहसीलदार त्यांच्याकडे पाठवावेत.
👇👇👇