Join our WhatsApp group

तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करत आहे का? जाणून घ्या या अगदी सोप्या पद्धतीने

Aadhar Card News

आजच्या काळात कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी काम करायचे असल्यास या कामासाठी तुम्हाला आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. सर्वच कागदपत्रे काढताना आधार कार्ड चा वापर होतो. उदाहरणार्थ कोणतेही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, सिम कार्ड घेण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी अशा सर्वच महत्त्वाच्या कामांमध्ये आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. 


एखादी व्यक्ती अनेक ठिकाणी आपले आधार कार्ड पण तुमच्या पाठीमागे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का याचा तुम्ही कधीच विचार करत नाही? परंतु तुमच्या आधार कार्डचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्याची कायदेशीर शिक्षा तुम्हालाच होऊ शकते. म्हणून तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करत आहे का हे पाहणेही अतिशय महत्त्वाचे आहे. आता हे तुम्ही अगदी घरबसल्या काही मिनिटांमध्ये तपासून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्डची हिस्टरी तपासावी लागणार आहे. 


तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करत आहे का हे तपासून घेण्यासाठी आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. 


या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला माय आधार हा पर्याय निवडावा लागेल.


त्यानंतर या माय आधार पर्यावर क्लिक करा आणि आता तुम्हाला आधार प्रमाणे करण इतिहास हा पर्याय निवडावा लागेल यानंतर तुम्हाला तो आधार कार्ड क्रमांक आवश्यक आहे ज्याचा इतिहास तपासायचा आहे तो आधार कार्ड क्रमांक येथे टाका. 


यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा कॅपच्या कोड टाकावा लागेल.


यानंतर तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. 


तुम्ही हे करता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी टाका.

त्यानंतर तुमच्यासमोर एक टॅब उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा इतिहास तपासायचा आहे ती तारीख टाकावी लागेल

तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची संपूर्ण हिस्ट्री पाहायला मिळेल. आधार कार्डचा कोणकोणत्या कामासाठी वापर झाला आहे हेही तुम्ही ऑनलाईन तपासून शकता. 


Post a Comment

Previous Post Next Post