Join our WhatsApp group

अंगणवाडी सेविका भरती 2023, दोन लाख पदे भरण्यास शासनाची मंजुरी

Anganwadi Sevika Bharati Shasan Nirnay GR 9th January 2023

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला सन 2017 ला वित्त विभागाकडून स्थगिती देण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका यांची 97 हजार 475, मिनी अंगणवाडी सेविका यांची 13011, आणि अंगणवाडी मदतनीस यांची 97 हजार 475 अशी एकूण 207961, पदे रिक्त आहेत. 



Anganwadi Sevika Bharati GR  9th January 2023 Download

अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय (जीआर)

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका 97475, मिनी अंगणवाडी सेविका 13011 व अंगणवाडी मदतनीस 97475 अशा एकूण 207961 इतक्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादित अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती संदर्भात, शासनाने वेळोवेळी केलेला सुधारणा लागू राहणार आहेत. त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादित भविष्यात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवण्यात येणार आहे याची दक्षता एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी असे शासन निर्णयात नमूद केले आहे. 


शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.




 




Post a Comment

Previous Post Next Post