अटल बांधकाम कामगार आवास योजना
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांना हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे.
ग्रामीण क्षेत्रातील बांधकाम कामगाराकडे स्वतःचे अगर कुटुंबाच्या नावे पक्के घर नसते अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत 269 चौरस फूट एवढे चटई क्षेत्राचे बांधकाम करण्यासाठी एक लाख 50 हजार रुपये थेट अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. असं कुटुंबाने अन्य कोणत्याही शासकीय आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा. संबंधित कुटुंबाकडे स्वतःचे पक्के घर नसावे किंवा ते कुटुंब बेघर असावे. असे शासनामार्फत सांगण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा?
लाभार्थी कुटुंबाने घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी केल्यास अनुदान 50 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंब भूमिहीन बेघर असणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासाठी सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव कामगार कार्यालयाकडे वेळेत सादर करावीत योजनेच्या लाभासाठी अर्जाचा नमुना ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्या स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Tags:
Gharkul Yojana