Mofat Pithachi Giran Yojana Satara
नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत गोरगरीब जनतेसाठी योजना राबवल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत पिठाची गिरण पुरवणे ही योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत राबवली जात आहे.सातारा जिल्हा परिषद सातारा महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत मोफत पिठाची गिरण ही योजना राबवली जात आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरण मोफत दिली जाणार आहे.
या योजनेच्या अटी आणि शर्ती
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये यापेक्षा कमी असावे
लाभार्थीचे वय 18 ते 60 वयापर्यंत असावे
जातीचा दाखला आवश्यक आहे.
लाभार्थी मालकीचा आठ अ उतारा
लाईट बिल झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स