नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पशुपालन योजनां साठी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झाली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर योजनेत निवड झाल्याबद्दल मेसेज मिळाला आहे. आता शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी त्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दुधाळ गाई म्हशी वाटप करणे योजना, शेळी पालन योजना, आणि कुक्कुटपालन योजना अशा नावीन्यपूर्ण योजनांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आता 4 फेब्रुवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत. दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांची अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार होऊन जाहीर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के ते 75 टक्के अनुदान.
पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी दुधाळ गाई/ म्हशी वाटप करणे योजना, शेळी पालन योजना, कुक्कुट पालन योजना अशा योजनांसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी पशुपालन हा जोड व्यवसाय जोड व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या प्रक्रियेमध्ये आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आता कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
पुढील कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
👉 फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
👉 सातबारा
👉 8 अ उतारा
👉 अपत्य दाखला
👉 आधार कार्ड
👉 सातबारा मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्त्वावर करारनामा
👉 अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
👉 रहिवासी प्रमाणपत्र👉 दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
👉 बँक खाते पासबुक सत्यप्रत
👉 रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र
👉 दिव्यांग असल्यास दाखला
👉 बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत.
👉 वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
👉 शैक्षणिक पात्रतेचा दाखला