Pm Kisan Yojana beneficiary list
नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या तेरावी हप्त्याची पात्र शेतकऱ्यांची यादी आता ऑनलाईन पाहता येत आहे या यादीतील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता मिळणार आहे. योजनेचा तेरावा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्या पर्यंत मिळू शकतो अशी शक्यता सांगण्यात येत आहे.
पी एम किसान योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेमध्ये अलीकडच्या काळात अनेक बदल झाले आहेत. शेतकऱ्यांची आधार केवायसी करणे बंधनकारक आहे तसेच शेतकऱ्यांना योजनेचे पैसे त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या योजनेची तेराव्या हप्त्याची पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येत आहे.