PM Kisan Yojana 13th hafta
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपये चा हप्ता दिनांक 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात. या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी दिला जाणार आहे.
पी एम किसान योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी सन 2019 मध्ये सरकारने सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये देते. या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी जमा होईल असे शासनाने अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
शेशेतकऱ्यांच्या या खात्यात येणार पैसे
शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खाते नाहीत त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार कार्ड ला बँक खाते लिंक करायचे आहे. ज्यांची आधार कार्ड ला बँक खाते लिंक नाही अशा शेतकऱ्यांसाठी शासन पोस्ट बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे. त्यामुळे इंडियन पोस्ट बँकेमध्ये शेतकऱ्यांनी खाते उघडावे.