नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या तेराव्या ची तारीख शासनाने निश्चित केले आहे 27 फेब्रुवारी 2023 या दिवशी संपूर्ण देशामध्ये पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. तसेच तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळेल का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ऑनलाइन पद्धतीने जाणून घेऊ शकता. शासनाने पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केले आहे.
Pm Kisan Yojana beneficiary list
पी एम किसान योजनेच्या तेराव्या ची तारीख 27 फेब्रुवारी 2023 ही आहे या दिवशी ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्यांची यादी आपण ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतो. यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यामध्ये बेनिफिशियरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच राज्य, जिल्हा, तालुका, व गाव निवडा यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थी शेतकरी यांची यादी दिसेल या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला तेरावा हप्ता निश्चितपणे मिळू शकतो.
आधार ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक
पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळण्यासाठी आधार केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार केवायसी पूर्ण असेल त्यांनाच पुढील तेरावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार इ केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे.