PM Kisan Yojana Beneficiary List
PM Kisan Yojana 13th installment
शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळेल की नाही हे तुम्ही आता ऑनलाईन तपासून शकता. यासाठी आम्ही खाली लिंक देणार आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही. तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडून त्या यादी तुमचे नाव पाहायचे आहे. या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. प्रत्येक चार महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते देण्यात आले आहेत आता या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार केवायसी करणे बंधनकारक आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांची अजूनही आधार केवायसी राहिली असेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येत आहे या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पुढील तेरावा हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आले आहेत अशा शेतकऱ्यांची ही यादी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येत आहे. मित्रांनो आम्ही खाली लिंक देत आहोत त्यावर क्लिक केल्यास तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाणार आहात. यानंतर तुम्ही तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. यानंतर तुमच्या गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात.