सातारा जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मित्रांनो सदर मेळाव्यात दहावी बारावी पदवीधर आयटीआय सर्व ट्रेड डिप्लोमा इंजिनियर कुशल अर्ध कुशल कामगार अशा प्रकारचे पंधराशे पेक्षा जास्त रिक्त पदे सरकारी वेबसाईट या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित आहेत. पंधराशे पेक्षा जास्त नोकरीच्या संधी या मेळाव्यात तरुणांसाठी मिळणार आहेत.
मेळाव्याचे ठिकाण
कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्च मंगळवार पेठ कराड नगरपरिषदेजवळ कराड जिल्हा सातारा येथे होणार आहे.