शेततळे अनुदान योजना
महाराष्ट्रामध्ये महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. शेतकरी शेतामध्ये शेततळे बनवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. शेततळ्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदानही देते. शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी 35 हजार रुपये अनुदान दिले जाते.
शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा
शेतकरी मित्रांनो शेततळे अनुदान योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. आम्ही खाली या वेबसाईटची लिंक देत आहोत. या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तुमचे शेतकरी प्रोफाइल बनवून घ्यायचे आहे. यामध्ये तुमची सर्व माहिती जसे की नाव पत्ता ईमेल आयडी मोबाईल नंबर बँक खाते नंबर शेतीचा सातबारा खाते उतारा माहिती शेतीच्या पिकाची माहिती शेतीमध्ये अगोदर असलेल्या सिंचन स्त्रोताची माहिती अशी माहिती भरावी लागते. माहिती भरल्यानंतर अर्ज करण्यासाठी शेततळे हा घटक निवडावा लागतो . शेततळे घटक निवडल्यानंतर त्याचे उपप्रकार निवडावे लागतात आणि अर्ज करावा लागतो. अर्ज करताना शेतकऱ्यांची 23 रुपये फी भरावी लागते.
शेतकऱ्यांची निवड कशी होते
शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते. शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन असा मेसेज येतो यानंतर शेतकऱ्यांनी सात दिवसाच्या आत त्यांची सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागतात. कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची व्हेरिफिकेशन होते आणि शेतकऱ्यांना पूर्वसंमती येते. यानंतर शेतकऱ्यांनी शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.