Join our WhatsApp group

65 वर्षावरील नागरिकांना एक हजार रुपये पेन्शन,योजनेचे नवीन अर्ज सुरू

 

नमस्कार मित्रांनो राज्य शासन 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी खूप चांगल्या योजना आणत आहे.. यामध्ये श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जाते. 


श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना  व  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

या योजनेमध्ये 65 व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन दिले जाते. ही योजना कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांना एकूण पाचशे रुपये पेन्शन दिली जाते. या पेन्शन रकमेमध्ये सध्या वाढ करण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना एक हजार रुपये पेन्शन दिली जाते. 

या योजनेच्या अटी आणि शर्ती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकूण उत्पन्न 21 हजार रुपये पर्यंत असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. 


आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला

तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांचा रहिवासी दाखला

रेशन कार्ड

तलाठी तसेच तहसीलदार यांचा एकवीस हजार च्या आतील उत्पन्न दाखला


Post a Comment

Previous Post Next Post