नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता उत्पन्न वाढलेल्या सर्व लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, खाजगी नोकरी करणारे, व्यवसायिक यांचा समावेश आहे. ज्या लोकांचे आर्थिक उत्पन्न जास्त आहे. त्या लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेती पाच एकर पेक्षा जास्त आहेत आणि जे शेतकरी सदन आहेत अशा शेतकऱ्यांची ही रेशन कार्ड बंद होणार आहे. तसेच 25 हजार पेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या पेन्शन धारका लोकांची ही रेशन कार्ड बंद होणार आहे. शासनाने थेट कारवाही करण्यापेक्षा लोकांना स्वतःहून रेशन कार्ड वरील अन्नधान्याचा लाभ स्वतःहून सोडण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिले आहे या तारखेनंतर जे लोक स्वतःहून रेशन कार्ड वरील अन्नधान्याचा लाभ सोडणार नाहीत त्यांना कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे.
मित्रांनो, 2023 या संपूर्ण वर्षांमध्ये रेशन कार्डधारकांना मोफत धान्य शासनामार्फत दिले जाणार आहे. ज्या योजनेचा लाभ देशातील सर्व गरजवंत रेशन कार्ड धारक घेऊ शकणार आहेत. या संपूर्ण वर्षांमध्ये रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य खरेदीसाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही. त्यांना रेशन धान्य अगदी मोफत दिले जाणार आहे. अशा या शासकीय योजनेचा लाभ पात्र आणि गरजू लोकांनी घ्यावा तसेच या योजनेतून ज्या लोकांची आर्थिक उत्पन्न वाढले आहे अशा लोकांना काढण्यासाठी सरकारने लोकांना स्वतःहून रेशन धान्याचा लाभ सोडण्याचे आवाहन केले आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत लोकांना स्वतःहून रेशन करण्याचा लाभ सोडण्यासाठी फॉर्म भरता येणार आहे. यानंतर जे लोक श्रीमंत असूनही रेशन धान्याचा लाभ घेत आहे अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.