Join our WhatsApp group

आज पासून सर्व महिलांना एसटीमध्ये हाफ तिकीट, शासनाचा अधिकृत जीआर आला

 

Sarv Mahilanna ST Pravas 50% Savalat Yojana Suru.

नमस्कार मित्रांनो, सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आजपासून राज्यातील सर्व महिलांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत योजनेचा अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी मधून प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते. एस टी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. 


सर्व महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये पन्नास टक्के सवलत येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सन 2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत शासनाने जाहीर केले आहे. ही योजना 17 मार्च 2023 पासून संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे. आज पासून सर्व महिलांना एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करण्यासाठी हाफ तिकीट आकारले जाणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post