एक शेतकरी एक डीपी योजना झाली सुरू, नवीन शासन निर्णय पहा

एक शेतकरी एक डीपी | yek shetkari yek DP 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे एक शेतकरी एक ट्रांसफार्मर ( डीपी) योजना सुरू करण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये कृषी सिंचनासाठी कृषी पंप चालवण्यासाठी विजेची उपलब्धता व्हावी यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजने संदर्भात चा शासन निर्णय दिनांक 21 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. 


शेतकरी मित्रांनो, राज्यात महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 संदर्भीय शासन निर्णय एक नुसार राबविण्यात येत आहे. सदर धरण अंतर्गत दिनांक एक चार 2018 पासून पैसे भरून वीज जोडणी करता प्रलंबित असणाऱ्या कृषी पंप अर्जदारांना पारंपारिक पद्धतीने वीज जोडण्या महावितरण कंपनी मार्फत देण्यात येत आहेत सदर धोरणांची अंमलबजावणी शासन निर्णय क्रमांक तीन नुसार सुरू आहे. 

शासन निर्णय 

सदर योजनेअंतर्गत सन 2022 23 या वर्षाकरिता प्रकल्पास प्रशासकीय मान्यता ही संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णयानुसार माननीय योजनेनुसार देण्यास व त्यात नमूद अटी व शर्तीनुसार संदर्भ क्रमांक पाच नुसार प्राप्त प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णयास जोडलेल्या विवरण पत्रानुसार घटक निहाय मागणीनुसार भांडवली खर्च मान्य करण्यात येत आहे. 

सन २०२२-२३ या वर्षाकरिता सर्वसाधारण वर्गातील सुमारे ३८२१० प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्याकरता येणारा खर्च सुमारे रु. १२९२ कोटी भाग भांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे.  

तसेच सन 2022 23 या वर्षी करता अनुसूचित जाती वर्गवारीतील सुमारे 4271 प्रदीप प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्याकरता येणारा खर्च सुमारे रुपये 123 कोटी भाग भांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत स्वतंत्र वीज जोडणी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर ( डीपी) मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती डीपी मिळणार याची सविस्तर माहिती शासन निर्णय पीडीएफ मध्ये पहावी. 



Post a Comment

Previous Post Next Post