गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे या योजनेमध्ये शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. सन 2022-23 या वर्षात राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पुढे सुरू ठेवण्यासाठी याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
शासन निर्णय
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2022 23 या वर्षात पुढे सुरू ठेवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनी निवडीसाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे देयकासाठी 256360 इतकी रक्कम आयुक्त ( कृषी) यांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.