Gudi Padwa Wishes in Marathi With Images | Gudi Padwa 2023
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी मध्ये
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखाची बरसात
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा !
गुढी उभारू आनंदाची
समृद्धीची, आरोग्याची
समाधानाची आणि उत्तुंग यशाची
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमची इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
चंदनाच्या काठीवर, शुभ सोन्याचा करा....
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा....
मंगलबाई गुढी त्याला भरचरी खन
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण....
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Tags:
Gudi Padwa