राज्य कृषी यंत्रीकरण योजना
नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट आहे. कृषी यंत्रीकरण योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरु झाली आहे. या संबंधित शासन निर्णय आला आहे. शेतकऱ्यांना २८० कोटी निधी वितरीत करण्यात येणार आहे. मित्रंनो कृषी विभागामार्फत विविध शासकीय योजनांची अंबलबजावणी करण्यात येते.
शासन निर्णय :-
राज्य पुरुस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेच्या सन २०२२-२३ अंबलबजावणी साठी २८० कोटी रुपयांच्या निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. असा शासन निर्णय आला आहे. कृषी विभागामार्फत विविध शासकीय योजनांची अंबलबजावणी करण्यात येते. कृषी यंत्रीकरण योजनेमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना व केंद्र पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ५०% पर्यंत अनुदान मिळते. राज्य पुरस्कृत यंत्रीकरण योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
Tags:
Maha DBT