LPG cylinder gas price
नमस्कार मित्रांनो, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या भावात आज पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 14.3 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचा दिल्लीतील भाव आता 1103/- रुपये इतका झाला आहे. मुंबईत गॅस सिलेंडरचा दर 1102.5/- इतका आहे.
मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आत्ता घरगुती सिलेंडर 1103/- रुपयांना मिळणार आहे. तसेच गॅस सिलेंडर धारकांना सरकारकडून दिली जाणारी सबसिडी या आधीच काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना आता गॅस सिलेंडर पूर्ण किंमत देऊनच घ्यावा लागत आहे.
उज्वला योजना अंतर्गत ज्यांनी गॅस कनेक्शन घेतले आहे त्यांना प्रति सिलेंडर 200 रुपयांची सबसिडी दिली जाते परंतु तरीही त्यांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी आज 903 रुपये द्यावे लागत आहेत.
Tags:
LPG Gas Subsidy