Join WhatsApp Group

या महिलांना मिळणार 1000 रुपये पेन्शन, असा करा अर्ज

 

Mahila  Pension Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो, निराधार महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एक हजार रुपये पेन्शन दिले जाते. या योजनेची पात्रता काय आहे? अर्ज कसा करावा? मंजुरी कशी मिळते याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. राज्यातील सर्व निराधार महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, आणि श्रावण बाळ पेन्शन योजना या योजना अंतर्गत 1000 रुपये पेन्शन प्रत्येक महिन्याला दिली जाते.

या महिलांना मिळणार पेन्शन 

निराधार महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या महिला, अत्याचारित महिला, वैशा व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, शेतमजूर महिला. आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला

उत्पन्नाचा दाखला 

रहिवाशी दाखला


अर्ज करण्याची पद्धत

अर्जदार निर्धारित केलेल्या नमुना एक मधील अर्जाच्या दोन प्रती तो राहत असलेल्या गावातील संबंधित तलाठ्याकडे अर्ज करेल.

अशा अर्जासोबत वर नमूद केलेल्या पात्रतेच्या अटीच्या पृष्ठयर्थ संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिक कार्याकडून अशा प्रमाणपत्रांचा व कागदपत्रांचा दोन प्रती अर्जदाराने मिळवाव्यात. 

तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबत कागदपत्राची शांती व पडताळणी करून अर्ज संबंधित तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडे पाठवावेत. 
Post a Comment

Previous Post Next Post