महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST) च्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये पन्नास टक्के सवलत मिळेल असे जाहीर केले होते. त्यांनी जाहीर केल्यानुसार ही योजना दिनांक 17 मार्च 2023 पासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू होईल असा अधिकृत शासन निर्णय ही शासनाने दिला आहे. या शासनाच्या निर्णयानुसार सर्व महिलांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार आहे.
महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत
शासनाने महिलांना 50 टक्के सवलत जाहीर केली परंतु काही अटीही आहेत याही जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. महिलांना एसटी प्रवासात हाफ तिकीट ने प्रवास करण्यासाठी काय अटी आहेत. हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
महिला प्रवासासाठी शासनाची अट समजून घेण्यासाठी उदाहरणार्थ समजून घेऊया समजा, कराड ते सातारा जाण्यासाठी या अगोदर 50 रुपये तिकीट असेल तर आता महिलांना 25 रुपये तिकीट आणि शासनाचा कर यासोबत द्यावा लागेल शासनाचा कर 10 रुपये असेल. तर महिलांना 35 रुपये एवढे तिकीट आकारले जाईल. हे फक्त उदाहरण आहे यानुसार अर्ध्या तिकिटा बरोबर शासनाचे काही ठराविक कर असेल तो महिलांना प्रवास करताना द्यावा लागणार आहे.