प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शेतकऱ्यांना त्यांच्या उतार वयात वयाच्या साठी नंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिले जाते. योजना सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर योजना आहे. शासन शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये देते त्याचबरोबर त्यांना पेन्शनही मिळावी या उद्देशाने किसान मानधन योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 36 हजार रुपये दिले जाणार आहेत.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्याचे वय १८ ते ४० वर्षे यादरम्यान असले पाहिजे. या योजनेमध्ये दरमहा 55 रुपये ते दोनशे रुपये वयानुसार गुंतवावे लागतात. शेतकऱ्याचे वय 60 झाल्यानंतर त्यांना तीन हजार रुपये प्रतिमा दिले जातात. शेतकऱ्यांना किसान सन्माननिधी योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात त्या निधीतून त्यांचे मासिक हप्ते कापून घेतले जातात म्हणजे त्यांना स्वतःहून एकही रुपया खर्च करावा लागत नाही.