Pm Kisan Yojana तेरावा हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम लगेच जमा होईल खात्यात
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात या योजनेतील तेरावा हप्ता सोमवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजून दोन हजार रुपये चा हा हप्ता मिळालेला नाही. हा हप्ता मिळण्यासाठी काय करावे लागेल कुठे तक्रार करावी लागेल याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना खात्यात डीबीटी च माध्यमातून रक्कम वितरित केले आहे. सोमवारी पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन हजार रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो पण हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसेल तर तुम्हाला त्या विरोधात तक्रार दाखल करता येते.
रक्कम जमा झाली नसेल तर येथे करा तक्रार
1. पी एम किसान टोल फ्री क्रमांक 18001155266
2. पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261
3. पी एम किसान लँडलाईन क्रमांक 011-23381092, 23382401
4. पी एम किसान नवीन हेल्पलाइन 011-24300606
5. पी एम किसान हेल्पलाइन नंबर 0120-6025109
Tags:
Pm Kisan Yojana