प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठी निधी वितरित करणे बाबत शासन निर्णय दिनांक 24 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता पुढील काही दिवसांमध्येच घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता लवकरच जमा होणार आहे. याबाबत शासन निर्णयाची माहिती सविस्तर आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत.
शासन निर्णय (GR)
सन 2022-23 या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिस्स्याच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग रुपये 490,03,90,000/- व राज्य शासनाचा हिस्सा रुपये 326,69,26,700 एवढा निधी वितरित करणे बाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.