Ration Card Maharashtra रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार शासन निर्णय
नमस्कार मित्रांनो, आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेशन धान्य ऐवजी रेशन कार्ड धारकांना पैसे दिले जाणार आहेत या योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल शिधापत्रितधारक शेतकऱ्यांना अन्नधान्या ऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. याचा शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2023 या दिवशी जाहीर करण्यात आला आहे.
रेशन धान्य ऐवजी पैसे
राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना रेशन धान्य ऐवजी प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतके रोग त्यांच्या थेट खात्यामध्ये दिले जाणार आहे. ही रक्कम डीबीटी च्या माध्यमातून दिली जाणार आहे. एका कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर त्या कुटुंबाला एकूण सहाशे रुपये मिळणार आहेत.